करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे, हि कार्यकारणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी जाहीर केली असून देशभरातून अनेक राज्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी निवडले गेले

आहेत. महाराष्ट्र राज्यातून युवक नेते आणि लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले सुरज चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणी नंतर सुरज चव्हाण हे अजित दादांच्या राष्ट्रवादी सोबत एकनिष्ठ राहिले होते आणि पक्षाने त्यांना मागच्या वर्षी पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. सुरज चव्हाण यांनी त्या संधीच सोन करत महाराष्ट्रभर युवकांची फोज उभा केली, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन युवक संघटना त्यांनी वाढवली. संपूर्ण

महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात युवक रोजगार मेळावे घेऊन तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी पक्षाशी जोडला, त्याचप्रमाणे सभासद नोंदणी, युवक मेळावे, वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरे, संघटना वाढीसाठी त्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम पदाधिकाऱ्यांना देऊन संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि संघटना वाढवली. लोकसभा,

विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेले यश हे प्रामुख्याने युवक संघटनेने केलेल्या धडाकेबाज कामामुळेच आले असे पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणात उघडपणे सांगितले त्यामुळे सुरज चव्हाण यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळेच हे शक्य झाल्याचे दिसून आले. या सर्व गीष्टींची पक्षाने दखल घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ सुरज चव्हाण यांच्या गळ्यात घालून त्यांना न्याय दिला आहे. त्यांच्या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत मुंबई येथे त्यांची भेट घेऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव परबजितसिंग स्वहानी, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, सांगलीचे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अकोल्याचे युवक कार्याध्यक्ष अजिंक्य राऊत, अकोल्याचे युवा नेते अजय मते यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *