
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे वृक्ष लागवडीच्या कार्याबद्दल करमाळा नगरपरिषद मधील बागमाळी किरण दुरगुडे यांचा सत्कार डॉ. रुपालीताई विक्रांत घुमरे, उपप्राचार्य तथा डॉ. अनिल साळुंखे, जिल्हा समन्वयक एन.एस.एस. प्रा. लक्ष्मण राख यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र हार नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय च्या समोरील प्रांगणात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून देखभाल करून तेथील परिसर आनंददायी व सुखावह मनाला आनंद देणारा झाला आहे त्यांच्या या कार्याची दखल महाविद्यालयानी घेऊन संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किरण दुरगुडे यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या कार्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे.
