![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/09/IMG.jpeg)
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थीनी गायकवाड काजल सौदागर हीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर शै. वर्ष-२०२३-२४ मध्ये अर्थशास्त्र विषयात सर्वात अधिक गुण मिळवून
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/06/IMG_20240615_104924-3-1024x592.jpg)
विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविले. त्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य वरिष्ठ विभाग डॉ. अनिल
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)
साळुंखे, उपप्राचार्य कनिष्ठ विभाग संभाजी किर्दाक यांनी तिचे अभिनंदन केले. त्याबद्दल तिचा सत्कार करुन पुढील शैक्षाणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तिला अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, डॉ. अंकुश करपे, डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर, डॉ. अस्मिता राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.