![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/09/IMG.jpeg)
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी फार्म) औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक रोहन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय रुई येथील रुग्णालयास
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/06/IMG_20240615_104924-3-1024x592.jpg)
भेट देऊन तेथील क्ष-किरण विभाग, औषध विभाग, रोग निदान विभाग व अतिदक्षता विभाग इत्यादी विभागास भेट देऊन, रुग्णालयाचे कामकाज कशा प्रकारे चालते, तेथील डॉक्टर कर्मचारी व पेशंट यांची भेट घेऊन रुग्णालया विषयीची माहिती
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)
जाणून घेतली. तसेच विश्व चैतन्य आयुर्वेदिक रस शाळा या ठिकाणी जाऊन कच्च्या मालाचा विभाग, पक्क्या मालाचा विभाग, विश्लेषणात्मक विभागात क्यू ए क्यू सी, तयार औषधे व औषध वनस्पती उद्यान या विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच वॉटर पुरिफिकेशन प्लांट गार्बेज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी तेथील विविध प्रकारच्या विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची संपूर्ण माहिती आत्मसात केली. तसेच महाविद्यालयांमधील प्राध्यापक रणजीत साखरे सर आणि प्राध्यापक शुभम हरिहर सर यांनी विद्यार्थ्यांसोबत वरील सर्व ठिकाणची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात संधी बाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.