करमाळा प्रतिनिधी
बिटरगावचे दिगंबर राखुंडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी प्रदेश सचिव अजित कुलथे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल कुमार राऊत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, दिगंबर पवार, महेश नलवडे आदीजन उपस्थित होते.