
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कला संचालयानाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत न्यु इरा पब्लिक स्कूल चिखलठाण व ज्यु. कॉलेज ता. करमाळा येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली.

शासकीय एलिमेंटरी परीक्षेत एकुण 41विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ए ग्रेड मध्ये 1, बी ग्रेड मध्ये 4 व सी ग्रेड मध्ये 28 पास झाले आहेत.
एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड मध्ये पास झालेले विद्यार्थी – ऋतुजा नितीन टकले, बी ग्रेड मध्ये पास झालेले विद्यार्थी – संध्याराणी श्रीकृष्णा लबडे, स्नेहल विकास गव्हाणे, मयुरी सचिन लोखंडे, राजनंदिनी प्रशांत आतकर, सी ग्रेड मध्ये पास झालेले विद्यार्थी – अक्षरा दादा पोरे, आयशा अमजद शेख, नम्रता प्रताप लोखंडे, समृद्धी दिगंबर शंकर, समृद्धी सचिन बोराडे, शिवानी राहुल लबडे, शिवानी रामचंद्र सरडे, श्रावणी धनाजी पोटे, श्रावणी गोरख लगस, श्रुतिका शरद पोळ, स्वरा प्रदीप शिंदे, तनया रोहिदास खोलासे, अक्षरा संदिपान कामटे, अवधूत संतोष उंबरे, धीरज धनंजय कोरे, कन्हैया ज्योतीराम जाधव, केतन दादाराम पोरे, पार्थ उमेश बोराडे, प्रणव सचिन धारक, रविराज राजेंद्र साबळे, रिषभ बाळासाहेब गावडे, शंभुराज सचिन निंबाळकर, शिवम उदयसिंह पाटील, सोहम ज्ञानदेव सरडे, सुहास भारत मुळीक, विरेन गंगाधर पोळ, यश ज्ञानदेव सरडे, विराज सचिन सरडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. न्यु इरा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी नेहमीच सर्व क्षेत्रात आघाडीवर असतात. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनील अवसरे, मुख्याध्यापक कसबे, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.