
जेऊर प्रतिनिधी
पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशन इंडिया, ग्लोबल फाउंडेशन आणि महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, पुणे यांनी गांधी भवन कोथरूड पुणे येथे पर्यावरणीय न्याय या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरविंद दळवी यांना राष्ट्रीय दर्जाचा बेस्ट ॲकडमीक एक्सलन्स अवॉर्ड फोर लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार डॉ. प्रवीण सप्तर्षी, श्रीलंकेतील केलोनिया युनिव्हर्सिटीचे डॉ.ए.जी अमरसिंगे, पेलेस्टाईन येथील अल-कुदस युनिव्हर्सिटीचे डॉ.मोहद इब्राहिम मुनथेर यांच्या हस्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च संचलित राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड यांच्या वतीने आयोजित पर्यावरणीय न्याय “दक्षिण आशियातील सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक समस्या” या विषयावर आंतरराष्ट्रीय अंतरशाखीय परिषदेचे आयोजन गांधीभवन कोथरूड पुणे येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भारत महाविद्यालय जेऊर येथील भूगोल विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरविंद दळवी यांना त्यांच्या या क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष राजू शेठ गादिया, सचिव प्रा.अर्जुनराव सरक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ अरविंद दळवी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
