
करमाळा प्रतिनिधी
भिम सैनिक करमाळा ता.संविधानाच्या अपमान करणार्या देशद्रोही गुन्हा दाखल करावा. भीम सैनिक पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा. गृहमंत्री यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा असे निवेदन साहेबराव वाघमारे भीम सैनिक यांनी दिले आहे.

परभणीत संविधान प्रतिकृती तोडफोड निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना. संविधान संरक्षण प्रेमी बौद्ध बांधव यांच्यावर पोलीस बळ घेऊन त्यांच्यावर अन्याय केला. तेथील तरुण सर्व समाज शांत असताना चोर सोडून साऊ असणार्या तरुण पिढी बरबाद कशी करता येईल. ह्याकडे सरकारने व पोलीस अधिकारी झालेल्या कृत्याचा निषेध नाही पण

करणार्या संरक्षण देऊन तो माथेफिरू आरोपी आहे असा सरकारचा आदेश देऊन आंदोलन कार्यकर्तेच दोष देत कोंबिग ऑपरेशन करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्या आंदोलन कर्ते शहीद भीम सैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी वकील शिक्षण घेत असणार्या पोलीस कस्टडी असताना मारहाणीत जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे पोस्ट मोर्ट्म रिपोर्ट आला आहे. यावरूनच संशय आहे की सरकार धर्म निरपेक्ष आहे का जातीयवादी मनूवादी या सर्व प्रकाराची उच्च स्तरावर चौकशी करून पोलीस अधिकारी संबंधितांवर मनुष्य वधाचा 302 गुन्हा दाखल करून मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक 50 लाख रुपयांची मदत करावी. मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस हे गृह खाते सांभाळू शकत नाही. त्यांनी धर्म निरपेक्ष व्यक्ती गृह खाते देऊन राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना भीम सैनिक साहेबराव वाघमारे यांनी सांगितले. यावेळी आण्णा साळवे, राहूल दामोदरे, दादा ससाणे भिम दल जिल्हाध्यक्ष, सुनिल भोसले, संजय भैलुमे, सागर कांबळे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष हणुमंत मांढरे, गुणवंत ठोसर, तेजस लांडगे, पप्पू उबाळे व तालुक्यातील अनेक शिव भीम सैनिक उपस्थित निवेदनात सह्या केल्या राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.