करमाळा प्रतिनिधी

परभणीत मुख्य चौक या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना व तोडफोड करून संविधानाचा अपमान करणार्‍या देशद्रोहीवर नराधामास तात्काळ कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. परभणीतील संविधान प्रतिकृती तोडफोडीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना. अनेक भीम सैनिक अनुयांकडून जो उद्रेक झाला

त्या संदर्भातील अनेक विविध गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे रद्द करून दोषमुक्त करण्यात यावेत. तसेच पोलीस मारहाणीत मृत्यू झालेला आंदोलक विधी या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणारा भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा पोलिस स्टेशन मध्येच मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याला न्याय मिळवून द्यावा. आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींस आर्थिक मदत व शासकीय सेवेत घेण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मा. जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, धनगर धर्म पिठ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले, आरपीआयचे नेते अर्जुन गाडे, कामगार आघाडीचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, विकास मेरगळ, राजेंद्र सरतापे, नामदेव पालवे, सुभाष देडगे, लक्ष्मण शिंदे, आण्णासाहेब महानवर, इत्यादी सह उपस्थितीत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *