
करमाळा प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनपर परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची नासधुस व विटंबना करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही करण्यात येऊन त्यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा परभणी या ठिकानी मुख्य चौकाच असलेल्या भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

पुतुळ्यासमोरील भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिका प्रतीमेची विटंबना एका मातेफिरूने केली. त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अंदोलण करण्यात आले. या आवमानकारक घटणेच्या निषेधार्थ अंदोलनानंतर पोलीसानी अंदोलकाना बेदम मारहाण केली आहे. या अंदोलनात विधी या शैक्षनिक वर्षामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भिमसैनिक सोमनाथ वेंकट

सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे आणि परभणी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अर्जुनराव गाडे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष यांनी केली. भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची नासधुस व विटंबणा करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही करण्यात यावी. परभणी घटने विरोधात अंदोलण करनाऱ्या संविधान प्रेमी नागरीक व भिमसैनिकवरती होणारी कार्यवाही व कोंबीन आप्रेशन थांबवण्यात यावे व नोंद केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. निदर्शने करते वेळी अर्जुनराव गाडे जिल्हाउपाध्यक्ष, अमोल कदम, अध्यक्ष बाळासो टकले, धनगर आघाडी रिपाई यशवंत गायकवाड, प. महा कामगार आघाडी यांची भाषणे झाली. यावेळी सुरेश धेंडे, जेष्ट नेते राजेंद्र सरतापे, ता. कार्याध्यक्ष नामदेव गायकवाड, पत्रकार चेतण कदम, राजकुमार लांडगे, सुभाष देडगे, सुरेश जाधव, राजु कांबळे, भिवाजी कोंडलकर, प्रकाश कोळी, दिपक दंडवते, दिपक कपटे, कर्णहार लांडगे, लक्ष्मण शिंदे, रघुनाथ थोरात, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.