करमाळा प्रतिनिधी

परभणी येथे झालेल्या संविधान तोडफोड व कोंबिंग ऑपरेशन निषेधार्थ यशपाल (दादा) कांबळे यांचे करमाळ्यात जाहीर निषेध आंदोलन झाले.

यावेळी सुहास ओहोळ, नितीन भोसले, युवराज जगताप, कालू कांबळे, मंगेश समंदर, वंचित चे विलास कांबळे  यशपाल कांबळे यांचे भाषण झाले.

 भाषणात कांबळे म्हणाले की, भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली परभणीतील त्याच पाठीमागे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या शेजारीच रेल्वे स्टेशन आहे तरीपण हा प्रकार घडला कसा जर तो आरोपी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला असता तर डिपारमेंट गप्प बसला असता काय ? रेल्वे स्टेशनवर जर ह्या प्रकार घडला असता तर डिपार्टमेंट गप्प बसले असते काय ? हा प्रश्न त्यांनी विचारला घटनाक्रम पाहिला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पाशील सिक्युरिटी गार्ड सुट्टीवर जातोच कसा हे प्रश्न यशपाल कांबळे यांनी मांडली पुढे कांबळे म्हणाले की 10. डिसेंबर रोजी बीजेपी संलग्न आरएसएस असतील विश्व हिंदू परिषद असतील किंवा विविध हिंदू संघटना असतील त्या कार्यक्रमातून आलेला तो व्यक्ती आहे. त्याने भारतीय संविधानाचे तोडफोड का केली ? परभणी मध्ये त्याच्याच पाठीमागे कलेक्टर ऑफिस आहे त्याच्या शेजारी परभणी रेल्वे स्टेशन आहे तिकडं जाऊन त्याने हा हा का केला नाही हा आमचा प्रश्न आहे. तदनंतर जिल्हाधिकारी यांनी जी घोषणा केली की ज्यांची तोडफोड झाली त्यांची भरपाई मिळून जाईल पण दलित समाजावर जो अन्याय अत्याचार झाला आहे त्यांची भरपाई कोण करणार ? दिनांक 15/12/2024 रोजी दलित चळवळीचा खंदा समर्थक सुरवंशी ह्याचा कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण ? पूर्ण परभणी तालुक्यामध्ये सरकारचं प्री प्लानिंग असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी यशपाल कांबळे यांनी परभणी जिल्ह्यातील जे कलेक्टर आहेत व जे आयएस ऑफिसर आहेत त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे.

परभणी येथील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृती वर जी दगडफेक झाली व सध्या दलितांवर चालू असलेले कोंबिंग ऑपरेशन याच्या निषेधार्थ यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कचेरीवर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. 

यावेळी जयश्री सावंत, दीपक लोंढे, नितीन गायकवाड, रंजीत कांबळे, अजय कांबळे, कालू कांबळे, मंगेश समिंदर, नितीन भोसले, प्रवीण भोसले, सचिन गायकवाड, हिरालाल पवार, संतोष पवळ, सचिन पोळके, विजय कांबळे, भीमराव (बाळू) कांबळे, कालिदास पवार, अमोल गायकवाड, मयूर कांबळे, संभाजी वाघमोडे, यश अनुप कांबळे, मंगेश लांडगे, अभी लांडगे, धनराज सरोदे, पप्पू भोसले, पप्पू वाघमारे, नवनाथ भालेराव, आकाश दामोदर, सुनील कांबळे, दादा घोडके, दिल्लीचं मुलांनी, फिरोज शेख, सागर आलट, रोहन भोसले, अमोल भोसले, वंचित आघाडीचे विलास कांबळे, किशोर कांबळे, सुगत कांबळे, गोविंदा खरात, समाधान खरात, राहुल गायकवाड, संतोष लांडगे, रोहित लांडगे, चिराग लांडगे, महादेव रणदिवे, नवनाथ रणदिवे, नागेश दामोदरे, नवनाथ आखाडे, बबन भोसले आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *