
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण येथील न्यु इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी यशवंतराव सभागृह बार्शी येथे महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने न्यू इरा पब्लिक स्कूल

चिखलठाण ला उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “कृतीशील शाळा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. तसेच सुजाता जाधव यांचा “कृतीशील शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष मा. आमदार दत्तात्रय

सावंत व इतिहास अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी स्वीकारला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद कसबे सर, पुरस्कार प्राप्त सुजाता जाधव व प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.