
करमाळा प्रतिनिधी
आ.भा.म. फुले समता परिषद महिला ता. करमाळा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त मोफत शिवण क्लास चे उद्घाटन संपन्न झाले.

दिनांक 15/12/2024 (वार-रविवार) या दिवशी शितलताई करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. मार्गदर्शक म्हणून जगन्नाथ जाधव सर (उपजिल्हाध्यक्ष.आ.भा.म. फुले समता परिषद) यांनी भूमिका बजावली. शिवण क्लास

मधून महिला सक्षम झाल्या पाहिजे असे मत जाधव सरांनी व्यक्त केले. आ.भा.म. फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष किशोर माळी यांच्या सहकार्यातून मोफत शिवण क्लाससाठी 5 शिलाई मशीन्स प्राप्त झाल्या. सदर मशीन्सचे उद्घाटन डॉ.निलेश मोटे यांनी केले. आलेल्या सर्व महिलांनी माता सावित्रीचा व माँ जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले व आलेल्या सर्व महिलांना एक महिना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जातील असे जाहीर केले. मास्टर ट्रेनर म्हणून निशिगंधा शेंडे (शहराध्यक्ष-आ.भा.म. फुले समता परिषद) व आरती स्वामी मॅडम ह्या लाभल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनिता राऊत मॅडम (तालुकाध्यक्ष-आ.भा.म. फुले समता परिषद) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विक्रम राऊत यांनी केले. चहापान घेऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.