करमाळा प्रतिनिधी

परभणी येथे दिनांक १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इस्मा वरती व त्याच्या पाठीशी असणाऱ्या गुप्त शक्तीचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनामध्ये बहुजन संघर्षणेने मागणी केली आहे, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमा वरती व त्याच्या पाठीशी असणाऱ्या शक्तीचा शोध घेऊन

त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे संविधानावरती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या भावना  दुखावल्या पर्यायाने आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आंदोलने केली मात्र पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून दलित समाजातील तरुण कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे असे गुन्हे दाखल झाल्यामुळे दलित समाजातील तरुणांची पिढी बरबाद

होईल, तरुणांवरती गुन्हे दाखल करू नयेत दाखल केलेले गुन्हे माघारी घ्यावेत कारण संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली नसती तर आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरली नसती. मग संविधानाची विटंबना झालीच नाही पाहिजे म्हणून शासनाने पूर्ण खबरदारी घेतली असती तर आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले नसते आणि भविष्यात सुद्धा विटंबना होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे कायदा सुव्यवस्था आभादीत राखण्यामध्ये गृहखात कमी पडत  असेल तर समाजामधून उद्रेक असा उपळतच राहील ही सर्व जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन विटंबणे सारखे प्रकार घडणार नाहीत याची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे घडलेल्या प्रकाराचा जाहीर निषेध करून दलित समाजाच्या तरुण पिढीवरती गुन्हे दाखल करून तरुण पिढीचे करियर बरबाद होणार नाही याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे यांनी स्वीकारले असून वरिष्ठांना कळवतो असे सांगितले. यावेळी उपस्थित करमाळा शहराध्यक्ष अजिनाथ कांबळे, करमाळा शहर सचिव कालिदास कांबळे, जिल्हा सचिव आप्पा  भोसले, तालुका सचिव रमेश भोसले,  संघटक राहुल कांबळे, संघटक अतुल चव्हाण, बापूसाहेब कांबळे, समशेर सय्यद, केकान सर आधी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *