
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील देवळाली गावचे मा. सरपंच आशिष कल्याण गायकवाड यांनी गावच्या शासकीय अंगणवाडी इमारतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करुन, शासकीय स्वस्त धान्य दुकान टाकले असल्याची तक्रार गावचे रहिवासी सुधीर विलास आवटे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने दि. 10/12/2024 रोजी सोलापूर

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशावरून उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 पोटकलम (1) ग व ज-3 अन्वये आशिष कल्याण गायकवाड यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदरच्या संपुर्ण प्रकरणात सुधीर विलास आवटे यांच्या वतीने ॲड. लक्ष्मीकांत गवई यांनी काम

पाहिले आहे. गायकवाड यांनी पदाचा गैरवापर करून देवळाली येथील शासकीय अंगणवाडी इमारतीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून, शासकीय स्वस्त धान्य दुकान थाटले होते. सन 2021 ते 2025 या कालावधीमध्ये देवळाली ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. सदरच्या निवडणुकीमध्ये आशिष कल्याण गायकवाड यांनी निवडणूक जिंकून थाटात सरपंच पदाचा पदभार घेतला होता. तद्नंतर गायकवाड यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण खाली करावे, व चिमुकल्यांची जागा त्यांना द्यावी. अशी सतत सहा महिने वारंवार कल्पना तत्कालीन सरपंच आशिष कल्याण गायकवाड यांना दिली होती. परंतु सदरची बाब त्यांनी गंभीरतेने अजिबात घेतली नाही. व अतिक्रमण काढून टाकले नाही परंतू मला उलट भाषा वापरली गेली. म्हणून मी रीतसर जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे सदर शासकीय अतिक्रमणाबाबत आशिष कल्याण गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीचा निकाल तक्रार दाखल केल्यानंतर सहा महिन्याच्या आत मिळून त्यांचे सदस्य पद रद्द होणे अपेक्षित होते. परंतु केवळ माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वरदहस्तामुळे सदर केसचा निकाल लागण्याकरिता चार वर्षाचा कालावधी लागला. असो…. उशिरा का होईना श्री नागनाथ महाराजांनी माझ्या न्याय्य व योग्य बाबीचा विचार करून मला न्याय मिळवून दिला. हा न्याय मिळवून देण्यामध्ये ॲड. लक्ष्मीकांत गवई यांचे मोलाचे योगदान मिळाले.