करमाळा प्रतिनिधी  

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीने दिनांक 6 डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान कर्नाटक येथील बेंगलोर येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा मधील महाविद्यालयातील  बी. ए. भाग – २ मध्ये शिकत असलेली दंगल गर्ल आश्लेषा बागडे ने ५७ किलो

वजनगटामध्ये रौप्यपदक प्राप्त केले. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये केरळच्या अमृतावर मोळी डावावर दहा झिरो च्या फरकाने विजयी सलामी दिली. दुसऱ्या राउंड मध्ये बिहारची अनुपमारीवर सुद्धा दहा झिरो ने मात करून कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला. कॉटर फायनल मध्ये सामना झाला तो

दिल्लीच्या नेहा कुमारी बरोबर नेहा कुमारीवर चमकदार तिच्यावर दहा झिरोच्या फरकाने मात करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये तिची लढत मध्य प्रदेशची कुमारी हंसाबेन सोबत झाली. या लढतीमध्ये चितपटीने विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये प्रवेश झाला तो हरियाणाची इंटरनॅशनल कुस्तीपटू तपस्वी बरोबर अखेरच्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये आश्लेषाला अवघ्या दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. परतु तिने सिल्वर मेडल पटकवून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दंगल गर्लने महाविद्यालयाचे व महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे. या घवघवीत यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *