
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दि.11 व 12 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम 9 वाजता सुरू झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फॉरेस्ट ऑफिसर माधुरी विनायक जाधव या आल्या होत्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले. कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लंगडी, कबड्डी, खोखो, धावणे, पोत्यातील उड्या, बेडूक उड्या, लिंबू चमचा इ. खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.