करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा साडे या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा घारगाव या शाळेने मोठा गट कबड्डी मुले यात अंतिम विजय मिळविला.
सदर अंतिम सामना जि. प. प्रा. शाळा वरकुटे विरुद्ध जि. प. प्रा. शाळा घारगाव यांच्यात लढत झाली. या लढतीत घारगाव शाळेने 7 गुणांनी विजयी मिळवला. तसेच बुद्धिबळ मोठा गट स्पर्धेत इ. 6 वी तील सुमित बिभीषण बारसकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या कामी घारगाव शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व क्रीडा शिक्षक विलास चव्हाण सर यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ घारगाव यांनी विजय खेळाडूचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.