
करमाळा प्रतिनिधी
दि. 3 डिसेंबर 2024 रोजी करमाळा तालुक्यातील, झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. योद्धा करिअर

अकॅडमी चे प्रशिक्षक मेजर सोंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले होते. तसेच संचालिका डॉ. स्वाती बिले, मुख्याध्यापिका अमृता परदेशी, सतीश कोंडलकर,

तानाजी हरणावळ तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्चिंग, लेझीम तसेच डंबेल याचे गुण प्रदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देशमुख आणि रूपाली शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.