करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या काही हितचिंतकांनी केली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकी प्रसंगी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना निष्कासित करण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशाने संबधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

करमाळा विधानसभा मतदार संघामध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा प्रचार करत असलेल्या व त्यांना पाठिंबा दिलेल्या जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मंडळ अध्यक्ष रामा ढाणे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार यांच्यासह विनोद महानवर पक्षाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली होती.

आता सदरची कारवाई माघारी घेत पुन्हा एकदा त्यांना सक्रिय काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या पदावरून त्यांना निष्कासित करण्यात आले होते तेच पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली आहेत. केवळ विनोद महानवर यांच्याबाबत हा निर्णय घेतलेला दिसून येत नाही. बाकी इतरांना सक्रिय होण्याच्या सूचना जिल्हा अध्यक्ष केदार सावंत यांच्या लेखी लेटर पँडवर देण्यात आल्या आहेत. यामुळे त्याचे हितचिंतकांचा हिरमोड झाला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *