करमाळा प्रतिनिधी

विश्वरत्न प्रज्ञासूर्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला

पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी मार्गदर्शन केले. “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते त्याची आठवण करून दिली. अविरत

कष्टाशिवाय या जगात काहीच मिळत नाही असे मत झोळ सर यांनी व्यक्त केले. तसेच प्राध्यापक धर्मेंद्र धेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता खाडे मॅडम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष राणा दादा सुर्यवंशी, सचिव मायाताई झोळ मॅडम सी. ए. ओ. डॉ.विशाल बाबर, नंदा ताटे स्कूल डायरेक्टर, सिंधू यादव प्राचार्या दत्तकला ज्युनिअर कॉलेज तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *