करमाळा प्रतिनिधी

करमाळा विधानसभेसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार करमाळा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे मा. ता. अध्यक्ष डॉ. सुजित शिंदे यांनी सांगितले आहे.

गेले कित्येक वर्ष मराठा सेवा संघाच्या मार्फत करमाळा तालुक्यासह महाराष्ट्रात विविध सामाजिक सहकार्य समाज बांधवांसाठी केले आहे. पूर्वी यासाठी रौद्ररूपाचे आंदोलने तालुक्यासह महाराष्ट्रात केले आहे. याबाबत वारंवार संबंधित

अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर आमचे वादविवाद झाले आहे. यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रा रामदास झोळ, शंभूराजे जगताप, सुनील सावंत आदींनी आंतरवली सराटी मध्ये

उमेदवारी साठी मागणी व उपस्थिती दाखवली होती परंतु समाजासाठी मी केलेले आतापर्यंतचे काम याची दखल घेऊन जरांगे पाटील हे मलाच उमेदवारी देतील असे खात्री डॉक्टर सुजित शिंदे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *