
करमाळा प्रतिनिधी
27 जुलै रोजी ऑनलाईन झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा अबॅकस अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. करमाळा येथे पार पडलेल्या या ऑनलाईन अबॅकस स्पर्धचे नियोजन मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांनी

.केले होते. सात मिनिटात 100 गणिते बरोबर सोडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमांचा उच्चांक मिळवलेल्या विद्यार्थ्याचा पालकांसमवेत बक्षीस वितरण सोहळा सहा ऑक्टोबर रोजी यशकल्याणी सेवाभावी संस्था येथे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे

अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील, नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य. मिलिंद फंड, नगर परिषद मुलींची शाळा नं.१. चे मुख्याध्यापक दयानंद चौधरी, नगर परिषद मुलांची शाळा नं.१. च्या मुख्याध्यापिका सुनंदा माने, प्रा. एम.व्ही.कांबळे,

स्वयंम संस्कर केद्राचे अध्यक्ष प्रा.उत्तम विटुकडे सर, तसेच प्रा.सारंग गुजराथी या सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या सहा ऑक्टोबर, रविवारी सायंकाळी 4:30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका प्रा.ज्योती मुथा या करणार आहेत.