
करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांनी केलेले आहे. या स्पर्धा दि. ०४ ते ०६ ऑक्टोबर २०२४ या

कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी

प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष उपस्थितांमध्ये विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, भारत महाविद्यालय जेऊर चे प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे.

या स्पर्धेसाठी विद्यापीठातून एकूण ३० संघ सहभागी होणार आहेत. यापैकी २० संघ मुलांचे तर १० संघ मुलींचे असणार आहेत. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविल्या जाणार आहेत आणि यातून विद्यापीठाचा संघ निवड होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धा मॅटवरती होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा, एन.एस.एस., एन.सी.सी. चे स्वयंसेवक सज्ज झालेले आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अतुल लकडे यांनी दिली.