करमाळा प्रतिनिधी

वर्षानुवर्ष रखडलेल्या करमाळा हिवरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते उद्या शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार असून या कार्यक्रमाला हिवरवाडी, वडगाव, भोसे या पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहावे असे आव्हान हिवरवाडी गावचे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांनी केले आहे.

या रस्त्याला एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडल्यामुळे हा रस्ता बंद पडला होता. या तीन गावातून किमान 400 ते 500 विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा शहरात येतात. अनेक शेतकऱ्यांना या रस्त्याचा वापर करावा लागत होता. वर्षानुवर्षे या रस्त्याचे काम राजकीय इच्छापाई बंद पडले होते. लोकसभा निवडणुकीत येथील विद्यार्थिनींनी सर्व पक्षांच्या प्रचार सभेला व प्रचार बैठकांना विरोध केला होता. यानंतर महेश चिवटे स्वतःच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. नंतर लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काम अडकले होते. मात्र आता या कामाचा शुभारंभ होत असून हा रस्ता मंजूर करून त्याचे पाठपुरावा करण्यासाठी हिवरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य जयराज चिवटे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रमेश कांबळे, माजी सरपंच बाळू पवार, शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, वडगावचे बापूराव गायकवाड, भोजराज सुरवसे, लखन काळे, रघुनाथ काळे, भालचंद्र युरे यांनी प्रयत्न केले.

…………..

पंधरा वर्षानंतर हा रस्ता होत असून हा रस्ता मंजूर करतो म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी आमची फसवणूक केली मात्र मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता मिळाला. हिवरवाडी, वडगाव, भोसे ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहे, अशी प्रतिक्रिया वडगावचे ह.भ.प. रघुनाथ काळे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *