सोलापूर दि.06 (जिमाका):-  कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरीत मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित आहे.

       महिला व बालविकास विभाग,  नवी दिल्ली  आणि राज्य शासनाच्या  बाल विकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24× 7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर  कोणीही या  सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.

         १०९८ या टोल फ्री क्रमांकावर वर संपर्क साधून  संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *