करमाळा प्रतिनिधी
काल मुंबई येथील मलबार हिल येथे राज्याचे ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नाभिक समाजातल्या सर्व संघटनचे प्रमुख पदाधिकारी व नाभिक बांधवांची मा. केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर, राज्याचे भाजपा पक्षाचे महामंत्री तथा ओबीसी नेते विजय चौधरी, माजी केंद्रीय विदेश मंत्री मुरलीधरन, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यावेळी उपस्थित होते.
नाभिक समाजातल्या पदाधिकारी व बांधवांनी आपल्या मागण्या प्रामुख्याने श्री संत सेना महाराज केशशिल्पी मंडळ कार्यन्वीत करुन पदाधिकारी नेमुणुक करावी, प्रताप गडावर शिवरक्षक जिवाजी महाले स्मारक, पन्हाळगडावरील नरवीर शिवबा काशीद पुतळा व समाधी स्थळ सुशोभाकिरण, माथेरान येथील हुतात्मा विर भाई कोतवाल व धामणगाव येथील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे, हुतात्मा सांडु सखाराम वाघ स्मारक सुभोभिकरण यासाठी निधी, चर्मकार बांधवाप्रमाणे टपरी योजना, वयोवृध्द नाभिक बांधवांना पेन्शन योजना, सलुन खुर्ची योजना, नाभिक बांधवांना अॅट्रासिटी कायदा प्रमाणे कायदा करावा आदी मागण्या यावेळी मांडल्या.
तसेच नाभिक समाजाची दुकाने ही चालती बोलती प्रचार कार्यालये आहेत. आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर निवडणुकामध्ये आम्हाला विचार करावा लागेल असेही ऊपस्थीत पदाधिकारी यांनी मान्यवरांना सांगीतले.
या सर्व प्रश्नावर लवकरच उपाययोजना करून या मागण्या सोडवण्याचा शब्द ऊपस्थीत मान्यवरांनी नाभिक समाजातल्या बांधवांना दिला.
जननायक कुर्पुरी ठाकुर यांना भारतरत्न दिल्याबद्दल तसेच नाभिक समाजासाठी विश्वकर्मा योजना तसेच पोस्टाचे तिकीट अनावरण केल्याबद्दल तसेच पहील्यांदाच नाभिक समाजाला बोलावुन बैठक लावल्याबद्दलही ऊपस्थीत मान्यवरांचे यावेळी नाभिक समाजातील बांधवांनी आभार मानले.
केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर तसेच ओबीसी नेते तथा भाजपा महामंञी विजय चौधरी साहेब यांनी महायुती सरकार नेहमीच समाजातल्या प्रत्येक घटकाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या कल्याणकारी भविष्यासाठी नेहमीच नवनवीन उपाययोजना राबवू असे त्यांच्याशी संवाद साधताना सांगितले.
या वेळी पि.एम.स्वनिधी योजना,प्रधानमंञी विश्वकर्मायोजना,मुद्रा योजना,स्कील इंडीया यासारख्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन ही नाभिक समाजाला करण्यात आले.
यावेळी राज्यातील विविध नाभिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थीत होते.