
करमाळा प्रतिनिधी
दि. ०५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातही शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त

केली. यावेळी विद्यार्थी प्राचार्य म्हणून महाविद्यालयातील बी.ए. भाग १ मधील विद्यार्थी लांडगे विश्वंभर यांनी काम पाहिले. अध्यापनाचे कामकाज झाल्यानंतर महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये सर्व शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील सर हे होते. यावेळी प्रा. अभिमन्यू माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अष्टपैलू असणे गरजेचे आहे आणि शिक्षकांकडून सर्व गुण अवगत करावेत.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.भाग १ मधील विद्यार्थीनी आफ्रिन मुजावर हिने व आभार प्रदर्शन कृष्णा पवार या विद्यार्थ्यांनी केले.