करमाळा प्रतिनिधी

आज कमलाभवानी ग्लोबलकॉर्प लि. पांडे येथे माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनरावजी (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण,  शाळेला शैक्षणिक साहित्याची वाटप अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कमलाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमलाभवानी ब्लड बँक करमाळा व कमलाभवानी ग्लोबलकॉर्प लि. पांडे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी, ऊस उत्पादक यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय मामा शिंदे, मोटार वाहतूक संस्थेचे अध्यक्ष सुजित तात्या बागल, बोरगाव चे सरपंच विनय ननवरे, अर्जुन नगरचे युवा नेते समाधान भोगे, हनुमंत बागल मांगी, आदी उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर क्षीरसागर, असिस्टंट जनरल मॅनेजर पाटील, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप, शेती अधिकारी पाटील सिविल विभागाचे प्रमुख टोणपे, परचेस विभागप्रमुख सय्यद, सुरक्षा अधिकारी धनके ऊस पुरवठा अधिकारी सुजय शिंदे, बनकर चीफ केमिस्ट जाधव, वित्त विभागाचे संजय पाटील, त्याचबरोबर माढेश्वरी अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये एकूण 81 लोकांनी आपले रक्तदान केले.

कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *