राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यामधील योगदानातून बद्दल महेश रणदिवे यांचा माजी आमदार नारायण (आबा ) पाटील यांनी सत्कार करून या कामगिरी बद्दल विशेष कौतुक केले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि
महेश गणपत रणदिवे यांनी रक्तदान, थैलेसिमिया गरीब रुग्णासाठी मदत आदी उल्लेखनीय काम केल्याबद्दल हिमाचल प्रदेश मधील कांगडा येथे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोविड रुग्णासाठी मदत केल्याबद्दल पुणे येथे शिवकार्य पुरस्काराने सन्मानित केले गेले.
होते. महेश रणदिवे हे करमाळा तालुक्यातील सुपुत्र असल्याने माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वतः महेश रणदिवे यांना आपल्या कार्यालयात
आमंत्रित केले.या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल मा. आ. नारायण (आबा) पाटील यांनी शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच पृथ्वीराज पाटील, विनोद खुपसे, प्रकाश खुपसे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्रिया देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले कि महेश रणदिवे यांचे कोविड काळत करमाळा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना रक्त मिळवून देण्यात मोठे योगदान व सहकार्य मिळाले. त्यावेळी रक्त तसेच प्लाझ्मा वेळेत मिळाल्याने शेकडो रुग्णांचे प्राण वाचले.
महेश रणदिवे हे युवा असून इतक्या लहान वयात देश पातळीवर अनेक राज्यात मोठी रक्तदान शिबीरे आयोजित करून एकप्रकारे राष्ट्रीय सेवेत मोठी कामगिरी केली. त्यांना अनेक राज्याने विविध पुरस्कारणे सन्मानित करून या योगदाणाची दखल घेतली आहे. याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो असे सांगून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी समस्त रक्तदात्यांच्या प्रतीही कृतज्ञता भाव व्यक्त केला. महेश रणदिवे यांना हिमाचल प्रदेश राज्याने पुरस्कार देऊन सन्मानित केल्या बद्दल सभापती अतुल पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, पांडुरंग वाघमारे सर, भीमराव सरक सर, भारत महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा मुंगुस्कर आदिनी विशेष अभिनंदन केले.