
करमाळा प्रतिनिधी
दि. 25/06/2028 गुरुवार रोजी देवळाली केंद्राची शिक्षण परिषद जि.प. प्रा.शाळा वैदवस्ती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार खाडे होते. अध्यक्ष व केंद्रातील मुख्याध्यापक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

वैदवस्ती शाळेच्या वतीने केंद्रातील सर्व शिक्षकांचा ‘छोटया गोष्टी मोठे बोध’ व आदर्श परिवार ही पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण परिषदेमध्ये दीक्षा ॲप कृती कार्यक्रम शिष्यवृत्ती मार्गदर्शन तसेच प्रशासकीय कामकाज इत्यादी विषयावर मार्गदर्शन झाले. केंद्रात चांगले काम करणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात आला.
करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ बांगर सर यांनी दिव्यांग अस्थिता अभियान व विद्यार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र काढणे याविषयी माहिती दिली. यावेळी अंधार सर ही उपस्थित होते.
शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल केंद्रप्रमुखांच्या वतीने वैदवस्ती शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैदवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिक प्रफुल्लता सातपुते यांनी केले. तसेच सूत्रसंचलन व आभार सहशिक्षक शांतीलाल खाडे यांनी मानले.