सोलापूर प्रतिनिधी

आदिवासी कर्मचारी संघटना म.राज्य शाखा सोलापूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण संघटनेचे राज्याध्यक्ष लक्ष्मण टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी धरती आबा, जननायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे, राणी दुर्गावती, क्रांतीवीर सोमा डोमा आंध, समशेरसिंह पारधी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीतील जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब गायकवाड, उपाध्यक्ष तुकाराम भुरके, कार्याध्यक्ष विश्वनाथ धुमाळे, कोषाध्यक्ष गणेश पवार, सह कोषाध्यक्ष रेणुकादास वाळके, सचिव किरणकुमार क-हाळे, सहसचिव अशोक वागतकर, संघटक सुरेश काळे, सदस्य कैलास ठाकरे सर, तसेच महिला प्रतिनिधी गंगासागर बेले, सल्लागार, अरुणा चाफे, सल्लागार दिगंबर काळे,प्रा.नितीन तळपाडे, डॉ.विलास काळे, लहु गभाले व इतर सदस्य मंगेश शिंदे, संदिप गायकवाड इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.यावेळी राज्याध्यक्ष लक्ष्मण टार्फे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून, आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध प्रशासकीय, सेवाविषयक व हक्कांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच आदिवासी कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजना, सवलती व संवैधानिक अधिकारांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना योग्य विचारपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच संघटनेचा विस्तार आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नितीन तळपाडे यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ धुमाळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन लहू गभाले सर यांनी केले.कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, सल्लागार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *