
करमाळा प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा दिनांक 29/ 8/ 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय कुमठा नाका इंदोर हॉल या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये भारत हायस्कूल जेऊरच्या नऊ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

14 वर्षे वयोगट बालाजी रमेश वाघमोडे, चैतन्य गोकुळ पाटील, संस्कृती धन्यकुमार गारुडी, शिवानी सिद्धेश्वर कुंभार, 17 वर्षे वयोगट सुयश पांडुरंग चव्हाण, अभा यशवंत व्हरे, कार्तिकी विनोद जाधव, 19 वर्ष वयोगट आदिती भीमराव सरक, समृद्धी दिनकर उघडे हे विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू आहेत.
यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश काटुळे सर, जिल्हा संघटनेचे सचिव दीपक शिंदे सर, पवन भोसले सर, नागनाथ बोळगे सर, बाळासाहेब सरक सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजयी खेळाडूंचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष राजू शेठ गादिया, संस्था सचिव प्रा.अर्जुनराव सरक सर,संस्था संचालक व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील, प्राचार्य दहिभाते सर, उपप्राचार्य कांबळे सर, पर्यवेक्षक शिंदे सर या सर्वांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.