करमाळा प्रतिनिधी

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या करमाळा शहराची कमलाई देवीचे तीर्थक्षेत्र म्हणूनही विशेष ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वराज्याचा वारसा आणि विचार पुढे नेण्यासाठी करमाळावासीयांकडून उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक निश्चितच भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन, स्मारक सुशोभीकरण तसेच नगरपरिषदेच्या ‘नमो उद्याना’च्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री गोरे म्हणाले, करमाळावासीय आणि शिवप्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी आणि रयतेच्या संरक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. अठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी उभे केलेले स्वराज्य आणि त्यांचे विचार आजच्या तसेच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, विचार आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने स्मारकाचे महत्त्व मोठे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५० लाख रुपये, तर करमाळा नगरपरिषदेच्या ‘नमो उद्याना’च्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या कामांसाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधीही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ, पाणीपुरवठा योजना, तालुक्यातील पाणीप्रश्न, अंतर्गत रस्ते तसेच रखडलेले बायपासचे काम याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले

.सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देतानाच पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास, अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्रे तसेच कमलाई देवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.यावेळी उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, यशवंत शिंदे,पृथ्वीराज पाटील, शंभुराजे जगताप, सावंत गटाचे नेते सुनील सावंत,जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीताई बागल, उपनगराध्यक्ष अतुल फंड, सभापती पूजाताई ढेरे, उपसभापती अजित विघ्ने, दशरथ कांबळे, विलासराव घुमरे, नगरसेवक संजय सावंत, विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत आवताडे,सभापती विक्रमसिंग परदेशी, सुनील लुणीया नगरसेवक, मान्यवर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक दीपक चव्हाण यांनी केले. आभार सोमनाथ सरवदे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *