कुर्डूवाडी प्रतिनिधी
संत श्रेष्ठ संत सेना महाराज यांची पुण्यतिथी कुर्डूवाडी येथे विठ्ठल मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली. सकाळी आठ ते नऊ विठ्ठल रुक्मिणी व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस अभिषेक अक्षय राऊत सपत्नीक करण्यात आला. नंतर ह. भ. प. धनंजय भोरे महाराज वाल्हेकर यांचे सुश्राव्य गुलालाचे कीर्तनास बार्शीतील बाल भजनी मंडळ व विठ्ठल
भजनी मंडळ यांची साथत संगत लाभली. करमाळा माढा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय गोरे, निवृत्ती गोरे, दादा गोरे, अरुण काकडे, सोमनाथ देवकाते, डॉ. आशिष रजपूत, हरी बागल, हमीद शिकलकर, हरी भराटे, बबलू कांबळे, इर्शाद कुरेशी, सुधीर शिरसागर सर, अविनाश गोरे, महेंद्र जगताप, आदि मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव उपस्थित होता. यानंतर संत सेना महाराजांच्या प्रतिमेची भव्य रथा मधून नगर प्रदक्षिणा शहरातून काढण्यात आली. भजनी मंडळ व महिला भगिनी समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश संघटक सुहास गाडेकर, अध्यक्ष दयानंद जाधव, नाना कोकाटे, वसंत चौधरी, भगवान दळवी, शशी गाडेकर, राजू दळवी, कुमार दळवी, अमोल गाडेकर, भीमराव कोकाटे, शंकर कोकाटे, सागर राऊत, अनंत राऊत, आकाश राऊत, गणेश कोकाटे, बाळू चौधरी, बाळू येळवे, पंडित सर, पंडित कन्हेरे, सुधीर गाडेकर, पप्पू खांडेकर, महेश जाधव, स्वप्निल राऊत, पिंटू गाडेकर, सौरभ गाडेकर, तेजस गाडेकर, सत्यवान वाघमारे, मोहन गाडेकर, हरिदास अवचर, विक्रम राऊत, योगेश सुर्वेकर, दत्ता वाघमारे, स्वप्निल राऊत, उमेश सुर्वेकर, जयंत राऊत, रोहित काशीद, धीरज गाडेकर, ओंकार गाडेकर, राहुल गाडेकर, औदुंबर राऊत, रावसाहेब दळवी, सोपान दळवी, महावीर दळवी, शुभम क्षीरसागर, आदी समाज बांधवांनी अपार कष्ट घेतले. सर्वांचे मनापासून मनःपूर्वक आभार आपला नाभिक बांधव अध्यक्ष दयानंद जाधव आदीजण उपस्थित होते.