
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी अजिंक्य लक्ष्मण दळवी यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा या दि. 29/08/2024 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय कुमठा नाका या ठिकाणी पार पडल्या.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्येज जाधव, नदीम शेख त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रकाश काटुळे सर, सोलापूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव दिपक शिंदे उपस्थित होते.
19 वर्ष वयोगटामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा मधील इयत्ता 11 वीचा खेळाडू अजिंक्य लक्ष्मण दळवी यांने इप्पी या प्रकारात प्रथम क्रमांक तर श्रीकांत शिवाजी वीर या खेळाडूचा सेबर या प्रकारात चौथा क्रमांक पटकावला. या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे व नागनाथ बोळगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजयी खेळाडूंचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्याल सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.