करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. मुक्ता प्रल्हाद काटवटे (महाडिक) यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी भूगोल विषयातून पी.एच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी  ‘Horticulture Farming in Southern Pune District : A Geographical Analysis’ (हॉर्टिकल्चर फार्मिंग इन सदर्न पुणे डिस्ट्रिक्ट अ जिओग्राफिकल ऍनालिसिस) या विषयावर संशोधन प्रबंध विदयापीठास सादर केला. यासाठी त्यांना शिवाजी, बार्शी येथील भूगोल व संशोधन विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.अर्जुन ननवरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी  अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *