करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने करमाळा येथे शुक्रवारी (दि. ३०) हा मेळावा संपन्न होणार आहे.

याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी माहिती दिलेली आहे.

करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सभागृहामध्ये 11 ते 3 या वेळेत सदर मेळावा पार पडणार आहे. याप्रसंगी करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर  तहसीलदार शिल्पा

ठोकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी सचिन तपसे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, यशकल्याणी संस्थेचे प्रमुख प्रा. गणेश करे–पाटील, भटके विमुक्त संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने, अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळाचे सुदर्शन तळेकर, वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे सोमनाथ चिवटे, जेष्ठ पत्रकार विवेक येवले, माजी सरपंच अंकुश जाधव, सरपंच किरण फुंदे, नाभिक संघटनेचे नारायण पवार, वडार समाज संघटनेचे संघटक माजी सरपंच अंकुश काळे, गुरव समाज संघटनेचे नागेश काळे आदिंची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा, वस्तीगृह, राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना, वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, वैयक्तिक घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, इतर सामाजिक योजना, संस्थात्मक योजना, महामंडळे आदि विषायाची माहिती दिली जाणार आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इतर मागास बहुजन विभाग सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *