करमाळा प्रतिनिधी

करमाळा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या पोफळज या गावांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा मायाताई झोळ यांनी कॉर्नर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान करमाळा तालुक्यामध्ये व्यावसायिक शैक्षणिक सुविधा, आरोग्याची दुरवस्था तसेच मांगी एमआयडीसी च्या साठीचा पाठपुरावा करून रोजगार निर्मिती तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, तसेच भिगवण येथील दत्तकला संकुला बरोबरच देवळाली येथील प्रस्तावित नवीन शिक्षण व्यावसायिक शिक्षण संकुलाच्या माध्यमातून आपल्या भागातील शैक्षणिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न येत्या काळात प्रा. रामदास झोळ सर यांच्या माध्यमातून होणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील येत्या काळामध्ये मोठ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत यामुळे पुढील काळामध्ये येणाऱ्या विधानसभेला प्रा. रामदास झोळ सर यांच्या पाठीमागे अतिशय ताकतीने उभा राहण्याची विनंती मायाताईं झोळ यांनी केली.

संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला अमोल सुरवसे, शिवाजी धुमाळ, अण्णा पवार, दत्तात्रय धुमाळ, सचिन पवार, लक्ष्मण पालखे, शरद पवार, धनंजय पवार, अभिजित पवार, प्रवीण पवार, विशाल हजारे, सागर कांबळे, शैलेश पवार, उमेश पवार, सचिन रगडे, हर्षद पवार, रमेश सुरवसे, महादेव क्षीरसागर, बलभीम पवार, पोपट राऊत, कांतीलाल गव्हाणे, दादासाहेब हातीकर, लक्ष्मण साळवे, जालिंदर पवार, नाना पवार, गजेंद्र पवार, अशोक शिंदे, सतीश पवार, माणिक देशमुख आदींसह गावातील युवक, वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *