
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविल्या राख्या
करमाळा प्रतिनिधी
साहेब आपण चालू केलेली लाडकी बहीण योजना यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब निराधार महिलांना भगिनींना आपण आर्थिक पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट केले त्याबद्दल ग्रामीण महिलांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे निराधार गोरगरीब महिलांच्या संसारामध्ये त्याचा मोठा हातभार लागणार आहे त्याबद्दल माझ्याकडून व ग्रामीण भागातील महिला भगिनी कडून रक्षाबंधनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आज आपणाला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी आम्ही भगिनी आपणापर्यंत पोहोचू शकत नाहीत, सौ लक्ष्मी सरवदे माजी सरपंच घारगाव आपणास पोस्टाने राखी पाठवत आहेत त्याचा स्वीकार करावा पुनश्चा एकदा आपले रक्षाबंधनानिमित्त हार्दिक अभिनंदन आपल्या हातून राष्ट्राची देशाची सेवा घडो हीच सदिच्छा !!!