
करमाळा प्रतिनिधी
दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करून ही सार्वजनिक बांधकाम खात्याने उमरड येथे गतिरोधक टाकले नाहीत म्हणून अखेर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सह. साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी उमरड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाचा धसका घेतला. दिनांक 14 रोजी उमरड येथे आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेल्या सर्व ठिकाणी गतिरोधक बनवून दिले. गावकर्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढे सदर ठिकाणी अपघात होणार नाहीत.
