करमाळा प्रतिनिधी

              २०१९ नंतर करमाळा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून आपण तालुक्यात विकासाचे राजकारण केले. एखादी गोष्ट होत असेल तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व ती कामे मार्गी लावली. परंतु एखादी न होणारी गोष्ट विनाकारण लोकांना खोट्या भूलथापा देऊन फसवणूक करणे हे काम मी केलं नाही आणि मी तसले राजकारण करतही नाही. त्यामुळेच २०१९ ते २०२४ या कार्यकाळात मतदार संघात भूसंपादन, सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व प्रशासन या कामासाठी जवळपास ३ हजार कोटी निधी आपण उपलब्ध केला असल्याचे प्रतिपादन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले.

          संगोबा व आवाटी येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आ.संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी झोळ, विलास पाटील, चंद्रहास निमगीरे, उध्दव दादा माळी, सुनील सावंत, अॅड. राहुल सावंत, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, अशोक पाटील, अॅड. रविंद्र विघ्ने, उपसरपंच अमर भांगे, अजिंक्य पाटील,किरण फुंदे, गोरख गुळवे, विनय ननवरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. जादूची छडी फिरवल्याप्रमाणे विकास एकदम होत नसतो. माझ्याकडून एखादे काम व्हायला उशीर झाला असेल परंतु ते पूर्ण करण्याकडेच माझा कल असल्यामुळे असंख्य रखडलेले प्रकल्प मी मार्गी लावू शकलो. त्यामध्ये नव्याने सब स्टेशनची निर्मिती, सबस्टेशनची क्षमतावाढ किंवा टेंभुर्णी जातेगाव रस्ता, कुकडी  प्रकल्प क्षेत्रातील गावांना पाणी देण्याचा विषय, डिकसळ पूल, हॅम अंतर्गत 71 किलोमीटर लांबीचा रस्ता ही विकास कामे मंजूर केल्याचे समाधान आपल्याला आहे.

          आज मान्यवरांच्या हस्ते करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा रस्ता प्रजिमा 5 – 4 कोटी 50 लाख, बोरगाव ते निलज रस्ता ग्रामा 81-2 कोटी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रामा 68 ते सटवाई वस्ती निलज ते बिटरगाव श्री रस्ता – 3 कोटी 28 लाख, पर्यटन विभाग – संगोबा घाट – 90 लाख, आवाटी दर्गा वॉल कंपाऊंड – 99 लाख, गौंडरे फाटा ते नेरले रस्ता – 2 कोटी 85 लाख, फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव इजिमा 8 रस्ता – 2 कोटी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्ता कामांचे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक व पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी विनय ननवरे, अॅड. राहुल सावंत, गौतम ढाणे, चंद्रकांत सरडे, भरत अवताडे यांनी मनोगते व्यक्त केली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

           या कार्यक्रमासाठी राजेंद्र बाबर, अॅड. अजीत विघ्णे, दादासाहेब सावंत, मानसिंग खंडागळे, अशोक पाटील, अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, शहाजी झिंजाडे, युवराज गपाट, दत्तात्रय अडसूळ, राजेंद्र धांडे, तात्या पाटील, राजेंद्र पवार, सुहास रोकडे, सतीश शेळके, मयूर रोकडे, बापू तांबे, बबनराव मुरुमकर, आशिष गायकवाड, भरत अवताडे, सुजित बागल, परमेश्वर भोगल, गौतम ढाणे, नानासाहेब मोरे, पोपट सरडे, संतोष गायकवाड, भोजराज सुरवसे यांचे सह तालुक्यातील निलज, बोरगाव, घारगाव, तरडगाव, बाळेवाडी, गौंडरे, नेरले, हिवरे, आवाटी, कोळगाव, पोथरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *