करमाळा प्रतिनिधी

           उमरड ता. करमाळा येथे ग्रामस्थांच्या वतीने नुतन पोलिस उपनिरीक्षक व पोलीस भरती झालेल्या अन्वर इमाम मुलाणी, कय्युम सलाल पठाण, मुनाफ हमीद सय्यद या युवकांचा सत्कार उमरड ग्रामस्थांच्या वतीने करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी व पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांच्या शुभहस्ते फेटा, हार, नारळ देऊन करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच प्रमोद बदे, तात्यासाहेब सरडे, चौधरी, डी.जी.बदे, साहेबराव मारकड, बापू चोरमले, अनिल सुरवसे, माजी सरपंच संदीप मारकड, देवीदास पाखरे, तात्या मारकड आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी तांबोळी म्हणाले की, ग्रामीण भागातून खडतर प्रवास करून इतकी मोठी मेहनत घेऊन पोलीस होण ही फार मोठी गोष्ट आहे. सर्व ग्रामस्थांनी या नवनिर्वाचित पोलिस अधिकारी चा सत्कार केला सन्मान केला. याचा युवकांनी आदर्श घेऊन शिक्का आणि अधिकारी व्हा व आम्हाला तुमचा सत्कार करायला बोलवा आम्ही हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन मदत करु असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी माजी सभापती अतुल पाटील, प्रा. नंदकिशोर वलटे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन फोजमल पाखरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसुल शेख, इरफान शेख, इसाक शेख, अजित पठाण यांनी परीश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *