रयत क्रांती संघटनेचे संतोष वारगड यांचा बागल गटात जाहीर प्रवेश…
बागल गटात प्रवेश सत्र सुरू
प्रतिनिधी करमाळा.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष वारगड,जिंती येथील सिकंदर शेख,अंकुश महाराज खराडे यांनी श्री.मकाई सह. साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शेटफळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर प्रवेश केला.मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला गावपातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.युवा नेते दिग्विजय बागल सर्व मतभेत विसरुन दुरावलेल्या सर्व सहकार्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार मेळाव्याप्रसंगी करत आहेत.यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तसेच सोगाव ग्रा.पंचायत मा.सरपंच कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक कैलास पाखरे यांनी वाशिंबे येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी मकाईचे संचालक दिनकर सरडे ,वांगी सोसायटीचे माजी चेअरमन विजय रोकडे,रामवाडीचे माजी सरपंच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संतोष वारगड यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मकाईचे संचालक रामभाऊ हाके नवनाथ बागल बापूराव चोरमले, रेवन्नाथ निकत,आमोल यादव,अशिष गायकवाड,राजेंद्र मोहोळकर गणेश तळेकर विलास काटे यांच्यासह बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील रंगनाथ शिंदे मकाईचे माजी संचालक सुरेश पोळ अविनाश वळेकर ,शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, सुनील पोळ, सुभाष पाटील, नानासाहेब पोळ, राजेंद्र गुंड, शंकर पोळ, विजय लबडे, गणेश मोरे, भाऊसाहेब निंबाळकर, महावीर निंबाळकर, साहेबराव पोळ, संभाजी पोळ, महेश घोगरे यांच्यासह या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते