जे आर डी माझा
वंचित बहुजन आघाडी मध्ये यशपाल कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे साहेब,जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण साहेब व जिल्हा महासचिव विशाल नवगिरे साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाश जी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथून आरक्षण बचाव यात्रा दिनांक 25/7/2024 सुरू होणार आहे यासंदर्भात टेंभुर्णी येथे बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीतील मध्येच राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे साहेब जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण साहेब जिल्हा महासचिव विशाल नवघरे साहेब यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये यशपाल कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते