करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील नीट परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असून पेपर लीक प्रकरणी योग्य ती पारदर्शक चौकशी झाली पाहिजे असे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी मांडले. याबाबत अधिक विस्ताराने बोलताना पाटील म्हणाले की, देशात सध्या नीट आणि नेट परिक्षा पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि भविष्य अंधारात आहे. करमाळा मतदार संघातील हजारो विद्यार्थ्यांनी नीट हि परिक्षा दिली आहे. हा केवळ विद्यार्थ्यांचाच प्रश्न

नसुन यावर हजारो कुटुंबांचे भवितव्य अवलंबून आहे. एका परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या मागे त्याचे संपूर्ण कुटुंब सुध्दा उभे असते. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावे ही स्वप्ने विद्यार्थ्यांच्या आई वडील भाऊ बहिण यांनी पाहिलेली असतात. यामुळे पालक कितीही अडचणी आल्या तरी आपल्या पाल्यास अभ्यासाला पुरक वातावरण, चांगले कोचिंग क्लासेस मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावून असतात. यामुळे पेपर लिक प्रकरण हे हजारो लाखो कुटुंबासाठी एक मोठे संकट आहे. या

प्रकरणी राजकारण न करता केंद्र सरकारने पारदर्शक चौकशी करावी. याचा मास्टर माईंड तातडीने शोधून काढावा. दोषीला पाठीशी न घालता कडक शिक्षा झाली तरच भविष्यात परिक्षांवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहील. करमाळा  मतदार संघातील नीट परिक्षार्थी विद्यार्थी आणि त्या कुटुंबाने मानसिकता खंबीर ठेवावी. आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून वेळ पडल्यास याबाबत न्यायालयात जाणे, आंदोलन आदि करण्याची वेळ आली तर मी व माझे सहकारी तयार असु असा विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, भारत महाविद्यालय प्राचार्य डॉ. अनंतराव शिंगाडे, भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव‌ दहिभाते, प्रा. डॉ. संजय चौधरी यांनीही नीट परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या मागे उभे राहण्याची भूमिका बोलून दाखवली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *