अंजनडोह व केडगाव ऍट्रॉसिटी ऍक्ट चे आरोपी अटक करा …. जवाब दो आंदोलन मध्ये घोषणा -यशपाल कांबळे*
जवाब दो आंदोलनादरम्यान पीडित विधवा महिलेचा आक्रोश
करमाळा: अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तब्बल वीस दिवस लोटूनही अटक न झाल्याने ते मोकाट फिरत आहेत,कायद्याचा धाक न राहिल्याने आज गोरगरीबांवर अत्याचार होत असून यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करणार आहे असे प्रतिपादन आरपीआय (आ) युवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी केले.
सदरील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गायकवाड चौक ते पोलीस चौकी पर्यंत जवाब दो व भव्य निदर्शने आंदोलन नागेशदादा कांबळे मित्र परिवार तसेच आरपीआय युवक आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी अंजनडोह येथील पिडीत विधवा महिलेच्या मयत पतीचे आरोपी न अटक केल्याने मुलबाळांसह आंदोलनास आले असता त्यांचा हदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावले.
यावेळी प्रशासनावर ताशेरे ओढत सर्वच वक्त्यांनी प्रशासनाचा निष्क्रियतेचा समाचार घेतला.यावेळी आंदोलकांनी घोषणा देत पोलीस स्टेशन परिसर दणाणून सोडला निवेदन नायब तहसीलदार काझी व पोलिस उप निरीक्षक माहूरकर यांना देण्यात आले होता.यावेळी अंजनडोह. केडगाव सह तालुक्यातील असंख्य बांधव उपस्थित होते
…..
तपास चालू आहे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल -अजित पाटील पोलिस उपविभागीय अधिकारी, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *