करमाळा प्रतिनिधी

भाजपा युमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शंभूराजे जगताप यांना भाजपा युमो जिल्हाध्यक्ष या पदावरून बडतर्फ करण्याचे पत्र पाठविले आहे.

या पत्रात असे म्हटले आहे कि, सोलापूर ग्रामीण पश्चिम या जिल्ह्यामध्ये पक्ष हितासाठी व पक्ष वाढीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर आपणास संधी देण्यात आली होती परंतु आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पक्षविरोधी काम केले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत आपणास पक्षातून बडतर्फ करण्याबाबत भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम च्यावतीने सर्वानुमते मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आपणास भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. असे या पत्रात म्हटले आहे.

हे पत्र माहितीसाठी भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, भाजयुमो महामंत्री सुदर्शन पाटसकर व कार्यालय मंत्री भाजयुमो प्रदेश कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *