
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सामान्य जनता आजही रश्मी बागल यांच्या पाठीशी असून कार्यकर्ता मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रश्मी बागल यांना तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन मकाईचे मा.चेअरमन दिग्विजय बागल यांनी केतुर येथील मकाईच्या नवनियुक्त संचालक सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर नाझरकर होते. करमाळा तालुक्यातील केतुर येथील रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी “कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. मोरवड, केम,वांगी नं ३ येथील मेळाव्यांनंतर हा चौथा मेळावा होता. ज्या पद्धतीने या मेळाव्यांना सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा व सहभाग दिसून येतोय ते पाहून अधिक जोमाने लोकांमध्ये मिसळून काम करण्याची माझी देखील उर्जा वाढत आहे, आता दिदींना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा निर्धार मनात घट्ट होत चालला आहे.

रश्मी दिदी सारखे सुसंस्कृत अन् उच्चशिक्षित नेतृत्व ओळखून पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी दिली आहे. तेव्हा करमाळा तालुक्यातून अशा नेतृत्वाला एक संधी दिलीच पाहिजे त्यासाठी जनमत तयार करण्याची जबाबदारी स्वतःहून सगळे उचलत आहेत ही महत्त्वाची बाब आहे.
यावेळी दिगंबर नाझरकर,कांतीमामा पाटील, कैलास निसळ, बाळासाहेब पांढरे, दिनेश भांडवलकर, अमोल खाटमोडे, ॲड.संतोष निकम, रामभाऊ हाके, सतीश नीळ, काशिनाथ काकडे, आजिनाथ खाटमोडे, अजित झांझुर्ने, विलास काटे, दत्ता गायकवाड, ॲड. जयदीप देवकर, रेवणनाथ निकत, दिनकर सरडे, गणेश झोळ, ॲड. सोनवणे, शैलेश झोळ, अशोक बप्पा पाटील, दत्तात्रय कनीचे, रामदास कनीचे, दिवेगव्हाण चे सरपंच हनुमंत पाटील, सरपंच युवराज मगर, स्वप्नील गोडगे, रणजित शिंदे, महादेव नगरे, शहाजी पांढरे, दत्ता कनीचे, धनाजी देवकाते, सागर पवार, लाला जरांडे, अमोल जरांडे, कीर्तेश्वर कोकणे, नाना खाटमोडे, पप्पू गुळवे, महेश तळेकर, महावीर तळेकर, मारुती काटकर, सोमनाथ कनीचे इ. प्रमुख पदाधिकारी तसेच केतुर नं २ पंचक्रोशीतील ग्रामस्थ या मेळाव्यास मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
………………………….
केतूर येथील आयोजित मेळाव्यात बोलताना बागल यांनी उजनी जलाशयात गोयेगाव ते आगोती, तसेच पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान पूल बांधणे, डीकसळ पूल टाकळी खातगाव पोमलवाडी केतूर पारेवाडी सावडी फाटा मार्ग हँम मधून विकसित करणे.