करमाळा प्रतिनिधी

तुळजाई वेल्फेअर फाऊंडेशन आणि पुण्यातील प्रसिद्ध बुधरानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचगाव येथे मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन मधुकर उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श सरपंच यशवंत भैय्या शिंदे आणि गार्गी यशवंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांची डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदू संदर्भातील तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मिळणार असल्याने या उपक्रमाचा अनेक नागरिकांना लाभ होणार आहे.

ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा हात पुढे करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, अनेकांना दृष्टी मिळवून देण्यासाठी तो उपयुक्त ठरेल, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी वैशाली शंकर उबाळे, भास्कर उबाळे, धर्म उबाळे, शशिकांत उबाळे, राजेंद्र पाटील, विजयकुमार पाटील, मिलिंद उबाळे, सुभाष उबाळे, सुभाष शिंदे, राजेंद्र उबाळे, महादेव माने यांच्यासह परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

तुळजाई वेल्फेअर फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *